प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर :मायलेकाचा शेतातील विजांच्या ताराचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळ्यातील नेबापुरात घडली आहे. नंदा मगदूम व अजय मुगदुम अशी मृत्यू झालेल्या मायलेकांची नावे आहेत.
आषाढी एकादशी दिवशीच अशी दुर्दैवी घटना घडल्याने पन्हाळा तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मगदूम मायलेक आज सकाळी जगताप नावाच्या शेतामध्ये गेले असता रानात अस्थाव्यस्त पडलेल्या वीजांच्या तारांना त्यांचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेमुळे नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा मन हेलावून टाकणारा होता. त्या मुळे महावितरणचा गलथान कारभाराचा नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे