कोल्हापूर जिल्ह्यातील ज्वेलरी व्यवसायाचे ठिकाणी, सुरक्षेकरीता 'ई पोलीस प्रणाली'व्दारे क्युआर कोड देवून नेमले पोलीस पेट्रोलींग

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर :मा. पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी सांगली येथे झालेला दरोडा व त्यानंतर कोल्हापूर जिल्हयामध्ये बालींगा येथील कत्यायणी ज्वेलर्स येथे झालेल्या दरोडयाचा गंभिर प्रकार विचारात घेवुन ज्वेलरी व्यवसायीक त्याच प्रमाणे सराफी व्यवसायीकांचे सुरक्षेच्या अनुषंगाने उपाय योजना राबविण्यासाठी सर्व पोलीस ठाणे स्तरावर सक्त सुचना दिलेल्या आहेत.



ज्वलेरी व सराफी व्यवसायकांचे सुरक्षेच्या अनुषंगाने केलेल्या उपाय योजने पैकी कोल्हापूर जिल्हयातील कोल्हापूर शहर विभाग, इचलकरंजी विभाग व करवीर विभागातील सर्व ज्वेलरी दुकानांची तसेच इतर संवेदनशिल ठिकाणाची माहीती घेण्यात आली सदर संवेदनशिल ठिकाणी सुरक्षा पुरवीणे आवश्यक असलेली एकुण ६१० इतकी ठिकाणे आहेत. त्या त्या ठिकाणी 'ई पोलीस प्रणाली' क्युआर कोड

पेट्रोलींग नेमण्यात आलेली आहे. त्यामध्ये आणखीण १५६ संवेदनशिल ठिकाणांची माहिती घेवुन त्या ठिकाणी ई पोलीस प्रणाली क्युआर कोड नव्याने देणेत आले आहेत. सदर ठिकाणी पोलीस पेट्रोलींग नेमण्यात आलेली आहे. अशा तीन विभागामध्ये एकुण ७६६ संवेदनशिल ठिकाणी 'ई पोलीस प्रणाली क्युआर कोड' देवुन पोलीस पेट्रोलींग नेमण्यात आलेली आहे. या प्रणालीमध्ये त्या त्या क्षेत्रामध्ये नेमण्यात आलेल्या पेट्रोलींगचे अधिकारी अथवा अंमलदार यांनी किमान दिवसा व रात्री दोन- दोन वेळा भेट देवुन क्युआर कोड मोबाईल व्दारे स्कॅन करावयाचे आहे. त्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये समजुन येणार आहे. त्याव्दारे सदर ठिकाणी कोणी भेट दिला, किती वाजता दिली, यांची माहिती मिळणार आहे.

 'ई पोलीस प्रणाली' क्युआर कोड ज्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी पोलीसांची सतत पेट्रोलींग राहणार आहे. त्यामुळे ज्वेलरी, सराफी व्यवसायासह अन्य व्यापारी वर्गानाही सुरक्षा मिळणार आहे. या पोलीस प्रणालीचे अनुषंगाने पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी यांना, मा.पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी लेखी आदेश देवुन सक्त सुचना दिलेल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post