गडहिंग्लज तालुक्यातील हेब्बाळ येथील दोघांच्या कडुन शेतात लावलेला साडेसांत लाख किमतीचा गांजा जप्त.

  स्थानिक गुन्हे अन्वेषण यंत्रणेची कारवाई.


प्रेस मीडिया लाईव्ह  : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : मा. पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडीत सो यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेष मोहीमेअंतर्गत अंमली पदार्थाचा साठा वाहतुक, विक्री व सेवन करणारे इसमांना शोधून काढून त्यांचे विरुद्ध कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत.

मा. पोलीस अधीक्षक सो यांनी दिले आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, महादेव वाघमोडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस पथके तयार करून माहिती घेत असताना, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार विलास किरोळकर यांना विष्णु कांबळे व त्याचा मुलगा   काशाप्पा कांबळे दोघे रा. हेब्बाळ, ता. गडहिंग्लज या दोघांनी मिळुन हेब्बाळ गावातील त्यांचे शेतातील ऊस पिकामध्ये बेकायदेशीर गांजा वनस्पतीची लागवड केले असले बाबत दि. 16.06.2323 रोजी खात्रीशीर माहिती मिळाली.

सदर बातमीचे अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक सो, कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री. महादेव वाघमोडे, पो.उप निरीक्षक श्री. शेष मोरे, पोलीस अंमलदार सुनिल कवळेकर, संभाजी भोसले, खंडेराव कोळी, विलास किरोळकर, किरण शिंदे, विनायक चौगुले, तुकाराम राजीगरे, महेश गवळी, अमित सर्जे, रणजित कांबळे, महेश खोत, संजय इंगवले, रणजित पाटील, सागर चौगुले, शिवानंद मठपती, अनिल जाधव व राजेंद्र वरंडेकर यांनी मिळाले बातमी प्रमाणे हेब्बाळ, ता. गडहिंग्लज या गांवी जावून विष्णु कांबळे व त्याचा मुलगा काशाप्पा कांबळे यांचे शेत जमीन गट क्र.834 नधील शेतात असणारे ऊसपिकाची खात्री केली असता त्यामध्ये गांजाची अंदाजे 7 ते 8 फुट उंचीची

एकूण 75 झाडे असलेची खात्री झाली. सदरबाबत गावकामगार तलाठी तसेच मंडल अधिकारी यांचेशी पत्रव्यवहार करुन त्याना बोलावून घेवून 01) विष्णु सर्जाप्पा पिरापगोळ उर्फ कांबळे व 02 ) काशाप्पा विष्णू पिरापगोळ उर्फ कांबळे, दोघे रा. हेब्बाळ, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर यांचे शेत जमीन गट क्र. 834 मधील

शेतातील असले ऊसपिकात एकूण 75 गांजाची झाडे मिळून आलेने ती गांजाची झाडे उपटवून त्याचा एकूण 107 किलो 400 ग्रॅम वजनाचा 7,57,050/- रुपये किंमतीचा गांजा जप्त करुन ताब्यात घेतला. 

आरोपी 01 ) विष्णु सर्जाप्पा पिरापगोळ उर्फ कांबळे व 02 ) काशाप्पा विष्णू पिरापगोळ उर्फ कांबळे, दोघे रा. हेब्बाळ, ता.गडहिंग्लज, जि. कोल्हापूर यांचे विरुध्द गडहिंग्लज पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास गडहिंग्लज पोलीस ठाणेमार्फत सुरु आहे. आशा प्रकारे कोणी इसम गांजाची लागवड साठा अगर विक्री करीत असल्याचे निदर्शनास आलेस तात्काळ पोलीस प्रशासनास माहिती द्यावी. माहिती देणायाचे नाव गोपनीय ठेवून योग्य ते बक्षीस देण्यात येईल असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडीत यांनी केले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडीत सो, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई सो यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक श्री. शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार सुनिल कवळेकर, संभाजी भोसले, खंडेराव कोळी, विलास किरोळकर , किरण शिंदे, विनायक चौगुले, तुकाराम राजीगरे, महेश गवळी, अमित सर्जे, रणजित

Post a Comment

Previous Post Next Post