प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर -सोशल मिडीया वरिल आक्षेपार्ह संदेश व्हायरल मुळे आज कोल्हापुरात तणाव निर्माण झाला होता.काही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टाऊन हॉल परिसरात काही फळ विक्रेत्यांच्या गाडीचे नुकसान करून काही दुकानावर दगडफ़ेक करून नुकसान केले आहे.
संवेदनशील भागात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर अचानक स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून रस्तारोकोही करण्यात आला होता.लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात वरिष्ठ अधिकारी ठाण मांडून लक्ष ठेऊन आहेत.
या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होऊन कोल्हापुरातील काही तरुणानी आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे याच्या निषेधार्थ आणि संबंधितावर कारवाई करण्याच्या मागणी साठी हिंदुत्ववादी संघटना कडुन उद्या तारीख 7 जूनला कोल्हापूर बंदची हाक दिली आहे.