प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-गुरुवारी आषाढ़ी एकादशी आणि बकरी ईद हे हिंदु -मुस्लिम बांधवाचे एकाच दिवशी साजरे होणार आहेत.त्यामुळे हिंदु -मुस्लिम बांधव प्रार्थना आणि विवीध धार्मीक सोहळे साजरे केले जातात.या निमीत्ताने शहरातील सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिस दलाच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावरुन संचलन करण्यात आले .
पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर शहराचे अधीक्षक अजित टीके यांच्या उपस्थितीत बिंदु चौक,शिवाजी पुतळा ,मिरजकर तिकटी ,महाद्वार रोड या मार्गे संचलन करून त्याची बिंदु चौकात सांगता झाली.यात स्ट्रायकिंग फोर्स कडील जवान ,लक्ष्मीपुरी ,जुना राजवाडा ,राजारामपुरी आदी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आणि पोलिस कर्मचारी यांनी सहभाग घेतला.