प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : मा. पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडित यांनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर म्हणून पदभार स्विकारलेनंतर दि. १५/०६/२०२३ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, विशेष शाखा व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांची गुन्हे तपास, कायदा व सुव्यवस्थेचा आढावा, पर्जन्यकाळातील नियोजन, येवू घातलेल्या आषाढी एकादशी, बकरी ईद सणांच्या पार्श्वभुमीवर सदरचे सण उत्सव शांततेत पार पाडले जावेत या करीता आवश्यक प्रतिबंधात्मक कारवाईचे नियोजनाचे अनुषंगाने मासीक गुन्हे परिषदेचे पोलीस अधीक्षक कार्यालयातील मिटींग हॉल येथे आयोजन केले होते.
मा. पोलीस अधीक्षक, कोल्हापूर श्री. महेंद्र पंडित यांनी उपस्थित वरिष्ठ पोलीस अधिकारी, विशेष शाखा व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना बैठकीचे उद्दीष्ट व उद्देश कळवून सुरवातील कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे निहाय दाखल, पेंडींग व न्यायप्रविष्ठ गुन्ह्यांचा आढावा घेतला. गुन्हे तपासाची पद्धत व दोषसिध्दीचे प्रमाण वाढावे या करीता आचरणात आणावयाची कार्यपध्दती याबाबत मार्गदर्शन करुन नव नवीन तांत्रीक बाबी अंमलात आणणेबाबत मार्गदर्शन केले.
त्यानंतर मा. पोलीस अधीक्षक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा विभाग व पोलीस ठाणे निहाय आढावा घेतला. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवु नये या करीता करावयाची उपाय योजना याबाबत मार्गदर्शन केले.
तक्रारदारांचे तक्रारीचे प्राथमिक स्तरावरच निराकरण व्हावे, योग्य ती दखल घेवून कायदेशिर कारवाईसह आवश्यक्तेनुसार समुपदेशन कसे करावे याबाबत उपस्थित पोलीस अधिकारी यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मा. पोलीस अधीक्षक यांनी पर्जन्यमानाचे कालावधीत आपातस्थितीमध्ये करावयाची उपाय योजना साधनसामुग्री तसेच सध्याच्या जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवणेकामी कोल्हापूर जिल्ह्यातील गोपनीय विभागाचे कामकाज पाहणारे पोलीस अंमलदार यांना देखील मार्गदर्शन करुन त्यांना विविध आंदोलने व संभाव्य कायदा व सुव्यवस्थेचे संदर्भाने महत्वाची माहिती कशा प्रकारे संकलन कराबाची याबाबत मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे समाजकंटक गुन्हेगारांचेवर करावयाचे कायदेशिर कारवाईसह आवश्यक प्रतिबंधात्मक कारवाईचे वर्गवारी निहाय कशा प्रकारे नियोजन करावयाचे याबाबत मार्गदर्शन केले.
गुन्हे आढावा परिषदे करीता अपर पोलीस अधीक्षक, गडहिंग्लज, अपर पोलीसअधीक्षक, कोल्हापूर श्रीमती जयश्री देसाई, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती अण्णपुर्णा सिंह यांचेसह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व प्रभारी अधिकारी उपस्थित होते.