वंचितच्या वतीने 4 जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा

मुस्लिम तरुणांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर होणारे हल्ले थांबवण्याची करणार मागणी


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर : वंचित न्युज - सद्या राज्यात मुस्लिम समुहाला जाणीवपूर्वक जातीयवादी शक्तीकडून लक्ष्य केले जात आहे. जातींच्या आणि धर्माच्या नावाने राज्यात दंगली निर्माण करण्याचे षडयंत्र मनुवादी प्रवृत्ती करीत आहेत.

 बीड जिल्ह्यात परळी गावात मुस्लिम समाजातील जरीन खान याचा पोलिस कस्टडीमध्ये मृत्यू झाला. जळगाव अमळनेर येथील पोलिस कस्टडी रिमांड काळात मुस्लिम युवकाचा झालेला मृत्यू तसेच स्टेटस ठेवल्या कारणाने मुस्लिम समाजातील तरुणांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर होणारे हल्ले थांबले पाहिजेत ही भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहे. यासाठी दि. 4 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय पक्ष पदाधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आला. *बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा प्रभारी डॉ. क्रांतीताई सावंत होत्या*. या वेळी उत्तरचे जिल्हाध्यक्ष विलास कांबळे व दक्षिणचे दयानंद कांबळे हे उपस्थित होते.

     वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात जिल्हा पातळीवर मुस्लिम समुहातील लोकांना सोबत घेवून निषेध मोर्चा काढण्याचे आदेश पक्षामार्फत आले होते. या पार्श्वभूमीवर मोर्चाच्या नियोजनासाठी येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली.

      यावेळी जिल्ह्याच्या वतीने शुक्रवार दि. 4 जुलै 2023 रोजी निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.  सकाळी ११ वा. दसरा चौक येथील छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चास सुरुवात होईल. तरी कोल्हापूर जिल्ह्यातील मुस्लिम, दलित, बहुजन समाजातील स्त्री-पुरुष, युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे 

आवाहन बैठकीत करण्यात आले. या वेळी जिल्हा महासचिव महादेव कुंभार, संतोष सुळकडे, शिवाजी कांबळे, सिद्धार्थ कांबळे, कोल्हापूर शहराध्यक्ष मिलिंद पोवार, उपाध्यक्ष प्रवीण बनसोडे, दशरथ दीक्षांत, प्रवीण कांबळे, महीला आघाडी अध्यक्षा वासंती म्हेतर, जिल्हा सह सचिव विश्वास फरांडे, जिल्हा आय टी प्रमुख विद्याधर कांबळे, जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश कांबळे, करवीर तालुका अध्यक्ष भीमराव गोंधळी, शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे,पन्हाळा तालुका अध्यक्ष दामाजी जाधव, कागल तालुका अध्यक्ष साताप्पा कांबळे, हुपरी शहराध्यक्ष पांडुरंग मानकापूरे, करवीर महासचिव आर्जून कांबळे, शिरोळ महासचिव विश्वास शिंगे आदी उपस्थित होते.

__________


संजय सुतार

प्रसिध्दी प्रमुख

वंचीत बहुजन आघाडी कोल्हापूर.

Post a Comment

Previous Post Next Post