मग आता तुम्हीच सांगा प्रवाशांनी थांबायचे कुठे....?
तात्पुरते निवारा शेड उभारण्याची प्रवाशातुन जोरदार मागणी.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -टॉऊन हॉल परिसरातील असलेले एसटी बस स्थानक मोडकळीस आले होते.ते एसटी बस स्थानक एसटीच्या संबंधित विभागाने पाडुन दोन आठवडे होऊन गेले तरी पडलेली खर माती ,विटा आहे त्या ठिकाणीच आहे.अजून भरुन नेलेली नाही.
प्रवाशाना थांबण्यासाठी कोणताही आसरा नाही.एसटी बस स्थानक पाडण्या अगोदर पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे होती असे प्रवासी ,नोकरदारांचे मत आहे.आता पावसाळा सुरू होईल.मग प्रवाशांनी थांबायचे तरी कुठे ?. एसटी बस स्थानकाचे बांधकाम सुरू होईल तेव्हा होईल.पण प्रवाशांची सोय म्हणुन तात्पुरते निवारा शेड उभारण्याची गरज आहे.तरी संबंधित विभागाच्या अधिकारयांनी लक्ष घालून तात्पुरते शेड उभारावे अशी प्रवाशी वर्गातुन जोरदार मागणी होत आहे.