कोल्हापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाकडुन 17 लाख 28 हजार 950 रुपये किंमतीचा विना परवाना विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला .राजारामपुरी अकरावी गल्लीतील 1907 ई. बाई सावंत अपार्टमेंटच्या बेसमेंट मध्ये असलेल्या गाळ्यावर छापा टाकण्यात आला . या कारवाईने खळबळ उडाली आहे.
यावेळी तिथे परदेशातुन विना परवाना आयात केलेल्या उच्चप्रतिच्या विदेशी मद्या (स्कॉच) चा साठा विक्री करण्यासाठी आणल्याचे आढळून आले . आरोपी विक्रांत जयसिंग भोसले याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे या बाबत अधिक चौकशी केली असता त्याने आणखीन मधाचा साठा निर्मल अपार्टमेंट राजारामपुरी 12 गल्ली मधील दुकानगाळ्या मध्ये असल्याचे सांगितले. त्याने दिलेल्या माहितीवरून छाप्पा घातला असता तेथून मद्यासाठयासाठी गोडावून केलेले मिळुन आले. सोबतच तिथे विविध ब्रँडच्या मध्याचे 23 बॉक्स आढळले. त्या बॉक्सवर काँच का सामान असा सावधानतेचा इशारा असलेले छापील लेबल लावलेले होते. या बाबत अधिक चौकशी केली असता त्याने या गोडावूनचा व मद्य साठयाचा मालक अनिरूध्द अरुण राऊत हा असल्याचे सांगितले. अरुण राऊत हा सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. सदर दोन्ही ठिकाणी मिळून आलेल्या एकुण 35 यक्स मद्य साठ्याची व इतर मुद्देमालाची एकुण अंदाजे किंमत रुपये 17,28,950/- आहे.
सदरची कारवाई राज्य उत्पादक शुल्क मुंबईचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, सह आयुक्त प्रशासन व संचालक सुनिल चव्हाण, कोल्हापूर विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशानुसार तसेच कोल्हापूर जिल्हा अधीक्षक रविंद्र आवळे, उपाधीक्षक सकाराम खोत यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हाचे भरारी पथकाचे निरीक्षक पी. आर. पाटील, निरीक्षक अशोक साळोखे, नंदकुमार देवणे, जगन्नाथ पाटील, दुय्यम निरीक्षक व्हि. जे. नाईक, दुय्यम निरीक्षक धनाजी पोवार, श्रीमती उमा पाटील तसेच विशाल भोई, सचिन लोंढे, मारुती पोवार, जय शिनगारे, राहुल गुरव, जयदिप ठमके, शंकर मोरे, श्रीमती सविता हजारे, वैभव शिंदे, बलराम पाटील, सचिन काळेल. यांनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे असे निरीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.