प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा या राज्य वकिल परिषदेच्या अध्यक्षपदी येथील ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. विवेक घाटगे उपाध्यक्षपदी मुंबईतील ज्येष्ठ वकिल अॅड. डॉ. उदय वारूंजीकर यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र व गोवा राज्य परिषद कार्यकारिणीच्या रविवारी कोल्हापूर येथे झालेल्या विशेष सभेत निवडीवर एकमताने शिक्कार्मोर्तब करण्यात आले. अॅड. घाटगे यांच्या रूपाने २४ वर्षानंतर कोल्हापूर जिल्ह्याला दुसऱ्यांदा अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे.
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा या राज्य वकिल परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी कार्यकारिण सदस्यांची विशेष सभा कोल्हापूर येथे बोलाविण्यात आली होती.
कार्यकारिणीतील २५ पैकी १६ सदस्य बैठकीला उपस्थित होते . अध्यक्षपदासाठी ॲड. विवेक घाटगे यांच्या नावाला अॅड. वसंतराव भोसले व अॅड. सुभाष घाटगे तर उपाध्यक्ष पदासाठी अॅड, डॉ. उदय वारूंजीकर यांना अॅड. गजानन चव्हाण व ॲड. विठ्ठल कोंडे- देशमुख यांनी सुचक व अनुमोदन केले. अॅड, घाटगे व अॅड. वारूंजीकर यांची अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी एकमताने निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. निवडीनंतर बोलताना अॅड. विवेक घाटगे म्हणाले, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा या राज्य वकिल परिषदेच्या अध्यक्षपदाची विश्वासार्हतेने सोपविलेली धुरा निश्चितपणे यशस्वीपणाने पार पार्डेन, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी अखंडपणे चाळीस वर्षापासून वकिल, पक्षकारांसह सामान्य जनतेचा लढा सुरू आहे. अलिकडच्या काळात कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहभागामुळे हा विषय अंतिटप्प्यावर आला आहे. कोल्हापूरला खंडपीठाची स्थापना होणे ही काळाची गरज आहे. अध्यक्षपदाच्या कार्यकाळात खंडपीठासाठी प्राधान्याने प्रयत्न राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या कार्याची व्याप्ती वाढवून प्रत्येक जिल्ह्यात जावून वकिल, पक्षकार मंडळींशी संपर्क साधण्यावर भर राहिल, असेही त्यांनी सांगितले. उपाध्यक्ष अॅड. वारूंजीकर म्हणाले, महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलच्या कामाची व्याप्ती वाढविण्यासाठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकारिणी सदस्यांनी अधिकाधिक कालावधी देण्याची गरज आहे.
1999 साली अॅड महादेवराव आंडगुळे यांना महाराष्ट्र -गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्ष पदाचा पहिला मान मिळाला होता.त्या नंतर 24 वर्षांनी कोल्हापूर जिल्ह्याला अय्ड .विवेक घाडगे यांच्या रुपाने दुसरयांदा मिळाला आहे.विवेक घाडगे हे प्रत्येक सामाजिक प्रश्नात हिरीरीने भाग घेतात.टोलचे आंदोलन ,खंडपीठ ,अशा विवीध आंदोलनात सहभागी होत.