प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-ंं मंगळवारी झालेया आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणी संशयीतार कारवाई साठी हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारुन शिवाजी चौकात आंदोलन सुरू केले होते.गटागटाने कार्यकर्ते शिवाजी चौकात जमु लागले होते.पोलिस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता.
चौकाचौकातही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.,मोठ्या संख्येने जमाव एकत्र आल्याने त्याच्यांवर निय्ंतरण राहीले नसलेने कार्यकर्त्यांत हुल्लडबाजी सुरु झाली.काही ठिकाणी दगडफ़ेक करीत ,काही दुकानावरही दगडफेक करण्यात येऊन घोषणाजी करीत आंदोलन स्थळी गदारोळ माजला .कार्यकर्त्याना पोलिस प्रशासणा कडुन शांततेचे आवाहन केले जात होते.कार्यकर्ते शांत रहाण्याच्या मनस्थितीत नसलेने पोलिस प्रशासनाकडून जमाव पांगविण्यासाठी लाठीमार करावा लागला.लाठीमार चालू होताच कार्यकर्त्यांची पळापळ सुरु झाली.त्यात काही जण जखमी ही झाले.तर काही जणांणी चप्पला तेथेच टाकून पळ काढला त्यामुळे चौकात चप्पलांचा ढ़ीग मोठ्या प्रमाणात साचून होता. तो चप्पलांचा ढ़ीग जमाव पांगल्यावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचारयांनी त्या चप्पला एकत्र करून हटविण्यात आल्या.
या दरम्यान कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी शांतता राखण्याचे आव्हान केले आहे.तसेच पोलिस महानिरीक्षक यांनीही आंदोलन स्थळी भेट देऊन कोणत्याही अफवां बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री.राहुल रेखावार यांनी कोणीही कायदा हातात घेऊ नये.कायदा हातात घेतल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही.सध्या परिस्थिती नियंत्रणा खाली असल्याचे सांगून नागरिकांनी ही पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.