प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर – करवीर तालुक्यामधील बालिंगा येथील कात्यायणी ज्वेलर्सवर गुरुवारी भरदिवसा गोळीबार करून दरोडा टाकणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतलं . काल स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कोपार्डे येथील विशाल वरेकर आणि दोंनवडे येथील सतीश पोहाळकर या सराफास ताब्यात घेत तब्बल 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केला . आरोपींना न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायायालयाने त्यांना 15 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. करवीर पोलीस इतर आरोपींचा कसून शोध घेत आहेत.