बालिंगा दरोडा प्रकरणी दोघा जणाना अटक करून त्यांच्या कडुन 30 लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त .स्थानिक गुन्हा अन्वेषण यंत्रणेची कारवाई.

     


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

  कोल्हापुर-करवीर तालुक्यातील बालिंगा परिसरात असलेल्या कात्यायनी ज्वेलर्सवर भर दिवसा चौघां  जणानी गोळीबार करीत दरोडा टाकला होता.या प्रकरणी पोलिसांनी दोघां जणाना अटक करून त्याच्या कडुन 30 लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून फरारी आरोंपीचा पोलिस शोध घेत आहेत.

अधिक माहिती अशी की,या दरोड्याचा तपास पोलिस सीसीसीटीव्ही आणि तात्रिंकदृष्टया आधारे करीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक श्री.महादेव वाघमोडे यांना खबरयां कडुन अशी माहिती मिळाली की ,रेकॉर्ड वरिल आरोपी विशाल वरेकर (रा.कोपार्डे). आणि सोनार सतीश पोहाळकर यांनी एक स्थानिक व चार परराज्यातील असा सात जणानी मिळून केल्याचे समजले असता पोलिसांनी या दोघांना   त्यांच्या रहात्या घरातुन छापा टाकून अटक केली.त्याच्या कडे पोलिस खाक्या दाखवित चौकशी केली असता त्या दोघांनी गुन्हयाची कबुली दिली आहे.

आरोपी विशाल कडुन 367 ग्र्यम वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्हयात वापरलेली चारचाकी स्विफ्ट डिझायर गाडी असा 30 लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदर आरोपी विशाल वरेकर हा पूर्वी जुना राजवाडा पोलिसांच्या फसवणूकीच्या गुन्हयात कंळबा जेल मध्ये असताना एका परराज्यातील आरोपीशी दोस्ती झाली होती.हे दोघे जेल मधून बाहेर पडल्यावर एकमेकांच्या संपर्कात होते.या दोघांनी कट रचला होता.त्या प्रमाणे परराज्यातील चार आरोपी विशाल वरेकर यांच्या घरी रहाण्यास आले होते.यासर्व आरोपीनी कात्यायनी ज्वेलर्सची रेखी करून तयारी केली होती.दरम्यान आरोपी सतीश पोहाळकर यांच्या मदतीने चार दिवसा करीता स्विफ्ट कार गाडी  नंबर एम एच-43-डी-9210 भाड्याने घेतली होती.सतीश पोहाळकर यांचे अंबिका ज्वेलर्स नावाचे बालिंगा येथे दुकानहोते.सध्या ते बंद अवस्थेत असून सध्या तो रंकाळा बस स्टॉप शेजारील आंबिका ज्वेलर्स या दुकानात काम करतो त्यामुळे तो ही हव्यासापोटी या कटात सामील झाला.या गुन्हयात वापरलेल्या दोन मोटार सायकली जुना राजवाडा आणि राजारापुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतुन चोरुन नेल्याचे निष्पन्न झाले.या घटने नंतर या दोन मोटार सायकली आरोपी सतीश पोहाळकर यांने कणेरकरनगर आणि फुलेवाडी येथील घरात लपवून ठेवल्या होत्या.या घटने नंतर आरोपी सतीश पोहाळकर आणि वरेकर यांनी परराज्यातील आरोंपीना कात्रज पुणे येथे सोडुन आल्याचे तपासात उघडकीस आले.परराज्यातील आरोपीं आणि स्थानीक आरोंपी चा शोध घेण्या करीता स्थानीक गुन्हा अन्वेषण शाखेची वेगवेगळे शोध पथके रवाना झाली आहेत.सदरची कारवाई मा.विशेष पोलिस महानिरीक्षक श्री.फुल्लारीसो ,पोलिस अधीक्षक श्री.महेंद्र पंडीतसो ,अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई,यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्री.वाघमोडेसो ,यांच्यासह त्यांच्या टीमने केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post