प्रेस मीडिया लाईव्ह :
दिनेश महाडिक :
कर्जत खालापूर विधानसभा व उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात सध्या जोरदार इन्कमिंग सुरू असल्याचे चित्र पाहायला दिसत आहे व सर्व शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळते.२५ जून रोजी चौक परिसरातील भाजपाचे नेते उत्तम शेठ भोईर यांनी आपल्या सोबत जवळपास ४०० हून अधिक भाजपाचे कार्यकर्ते घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला. त्यामध्ये मा. सरपंच संदेश जाधव, मा.उपसरपंच अमित मांडे, किशोरजी शिंदे, सौ. भाग्यश्री पवार, सौ. दीपिका भंडारकर, निखिल मोरे, गजानन पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यासोबत मा. आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहर शेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात शिवसेना नेते तथा शिवसेनेची बुलंद तोफ आमदार भास्करराव जाधव यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला. तसेच या पक्षप्रवेशाने शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळते व भाजपाला उतरती कळा लागली आहे.
हा पक्षप्रवेश सोहळा चौक येथील नढाळ या गावी असलेले पंचायतन मंदिर येथील सभागृहात हा सोहळा पार पडला. याप्रसंगी शिवसेना नेते तथा आमदार भास्करराव जाधव, शिवसेना उपनेत्या ज्योतीताई ठाकरे, संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर शेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नितीनजी सावंत, संपर्कप्रमुख डॉ. सुनील पाटील, तालुकाप्रमुख एकनाथजी पिंगळे, रघुनाथ पाटील, संतोष ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, मा. उपसभापती श्यामभाई साळवी, उपजिल्हा संघटिका अनिता पाटील, शैलाताई भगत, प्रीती कडव, ममता पाटील, मनीषा ठाकूर, सुजाता गायकवाड, उपजिल्हा अधिकारी निखिल पाटील, युवा सचिव प्रशांत खांडेकर, तालुका अधिकारी महेश पाटील, रमेश पाटील , वासांबे जि. प.विभाग प्रमुख अजू शेठ सावंत, सुरेश म्हात्रे, नीलम पाटील, एकनाथ मते, नितीन तवळे, बंटी नलावडे, सरपंच सुहास भाई कदम, मनोहर देशमुख, निखिल मालुसरे, मा सरपंच चौक सचिन मते, सुनील गायकवाड, उपसरपंच अमोल कदम ,हसन भाई शेख आधी सर्व शिवसेना आजी-माजी पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर याचे पडसाद कर्जत खालापूर उरण या मतदारसंघात पाहायला मिळते. भाजपा व मिंदे गटाने अनेकांना वेगवेगळी आमिषे दाखवून दडपशाही करून बळजबरीने पक्षांतर करून घेतले होते. तसेच मिंदे गट व भाजपाने आपली दिशाभूल केल्याने व दडपशाहीच्या कारभाराला कंटाळून बरेच कार्यकर्त्यांनी घर वापसी केली व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात शिवबंधन बांधून प्रवेश केला. व दोन्ही मतदारसंघात भाजपाला उतरती कळा लागली आहे हे प्रत्यक्षात आता दिसून येते. व प्रत्यक्षात पाहायला मिळते.