प्रेस मीडिया लाईव्ह :
दिनेश महाडिक :
विद्या प्रसारिणी सभा चौक संचलित
प्राथमिक विद्यामंदिर व शिशुमंदिर चौक
21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला..
सदर प्रसंगी आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे योगशिक्षक व औषध निर्माण शास्त्रातील वैद्यकीय व्यक्ती मा. श्री लक्ष्मीकांत विश्वनाथ महाजन सर तसेच संस्थेच्या कार्याध्यक्षा व प्राथमिक विद्यामंदिर व शिशूमंदिरच्या अध्यक्षा मा.सौ शोभाताई देशमुख, संस्थेचे सेक्रेटरी मा. श्री योगेंद्रजी शहा, संस्थेचे उपकार्याध्यक्ष मा.श्री नरेंद्रजी शहा, प्राथमिक विद्यामंदिर व शिशुमंदिर चे समन्वयक मा.श्री देवानंद कांबळे सर, प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका मा. सौ सुलभा मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते..
पाहुण्यांच्या स्वागताची सूचना सुलभा मॅडम यांनी केली. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.लक्ष्मीकांत महाजन सर यांचे स्वागत संस्थेच्या कार्याध्यक्षा व आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा.सौ शोभाताई देशमुख यांनी बुके व सन्मानचिन्ह देऊन केले. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा संस्थेच्या कार्याध्यक्षा व प्राथमिक विद्यामंदिर व शिशूमंदिरच्या अध्यक्षा मा.सौ शोभाताई देशमुख यांचे स्वागत श्री.देवानंद कांबळे सर यांनी बुके देऊन केले. शाळेचे समन्वयक मा.श्री देवानंद कांबळे सर यांचे स्वागत शाळेतील शिक्षिका सौ रीना मॅडम यांनी केले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ सुलभा मॅडम यांचे स्वागत रीना मॅडम यांनी केले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शब्दसुमनाने स्वागत करण्यात आले.
पाहुण्यांचा परिचय प्रिती मॅडम यांनी छान पद्धतीने केला....
आजचा दिवस म्हणजे योगायोगच म्हणावा लागेल.... आज मा.श्री लक्ष्मीकांत महाजन सर यांनी शाळेला भेट दिली.. त्यांना योगासनाचा 15 वर्षाचा अनुभव आहे. तो अनुभव त्यांनी आमच्या सर्वांशी शेअर केला. या अगोदर आम्हा सर्वांना योगासनाबद्दल माहिती होती. परंतु त्याबद्दल सखोल माहिती महाजन सरांनी आम्हा सर्वांना दिली. त्यामध्ये सूर्यनमस्कार कशाप्रकारे करावा या विषयी माहिती दिली. वज्रासना मध्ये बसून सरांनी आसने केली.'ध्यान कसे करावे', ॐ कार, ॐ चे उच्चार कसा करावा, या विषयी माहिती दिली. काही गमतीदार शब्द उच्चारले... त्यांचा उच्चार करताना आपल्या तोंडाची हालचाल कशी होते हे गमतीदार पद्धतीने सांगितले आणि सर्व मुलांना सर्व मान्यवरांना हसायला भाग पाडले.
ताडासन,वृक्षासन, त्रिकोनासन... अशी अनेक आसने श्री.महाजन सरांनी मुलांकडून करून घेतली....
आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या खास शैलीत दिपक सर यांनी केले. तसेच दिपक सरांनी विविध आसने मुलांकडून करून घेतली.
कार्यक्रमाची सांगता म्हणजेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रीना मॅडम यांनी छान पद्धतीने केले.
अशाप्रकारे योग दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करण्यात आला..