इंगळी चाबुकस्वार सच्छिद्र मुख्य पाईप लाईन कामास दत्तचे संचालक व अधिकाऱ्यांची भेट

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इंगळी/प्रतिनिधी:

श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंगळी (ता. हातकणंगले) येथील चाबुकस्वार सच्छिद्र मुख्य पाईपलाईन बसविण्याच्या सुरू असलेल्या कामास आज दत्त कारखान्याचे संचालक व अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.

  मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी प्रकल्पाच्या कामकाजाबद्दल विस्तृत माहिती शेतकऱ्यांना दिली. यावेळी कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील, बाळासाहेब पाटील, गार्डन विभाग प्रमुख प्रमोद पाटील, जवाहर बँकेचे चेअरमन रावसाहेब पाटील, माजी सरपंच दादा पाटील, लिंगाप्पा चौगुले, कुबेर चौगुले, इंजिनीयर माने, प्रकल्पाचे इंजिनिअर उमेश खोत यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंगळी येथील क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास सर्व ती मदत केली जाईल, असे आश्वासन यावेळी संचालकांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post