माय फौंडेशनचे गरजू विद्यार्थीनींना सायकल देण्यासाठी मदतीचे आवाहन


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : प्रतिनिधी :

 सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या माय फौंडेशन ( माहेश्वरी युथ फौंडेशन)  च्या वतीने गरीब , गरजू विद्यार्थीनींना सायकलचे वितरण करण्यात येणार आहे.यासाठी फौंडेशनने जुनी वापरण्या योग्य सायकल देण्याचे दानशूर व्यक्ती व संस्थांना मदतीचे आवाहन केले आहे.

येथील माय फौंडेशन या संस्थेच्या वतीने विविध सामाजिक व समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवण्यात येतात.विशेषत: आर्थिक समस्यांमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण खंडित होऊ नये , यासाठी आवश्यक ती शालेय साहित्याची मदत विविध माध्यमातून गरीब , गरजू विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिली जाते.

यामध्ये गेल्या तीन वर्षांपासून या संस्थेने सुमारे १३० सायकलींचे गरजू विद्यार्थीनींना वितरण केले आहे.याच अनुषंगाने यंदाच्या वर्षी गरजू खेळाडू मुलींना नव्या सायकली वितरण करण्यात येणार आहे.जेणेकरुन खेळाडू मुलींना अधिक चांगल्या पध्दतीने खेळामध्ये चांगली कामगिरी करुन आपले करियर घडवण्यास मोठी मदत होणार आहे.तसेच गरीब व गरजू  विद्यार्थीनींना देखील रिसायकल उपक्रमांतर्गत जुन्या सायकली दुरुस्त करुन वितरण करण्यात येणार आहे.

यासाठी फौंडेशनने जुनी वापरण्यायोग्य सायकल दानशूर व्यक्ती व संस्थांनी देण्याचे आवाहन केले आहे.ही जुनी सायकल चांगल्या पध्दतीने दुरुस्त करुन ती गरजू विद्यार्थीनींना वितरण करण्यात येणार आहे.त्यामुळे या मदत कार्यासाठी इच्छुक असलेल्या दानशूर व्यक्ती व संस्थांनी माय फौंडेशनचे अरुण बांगड ( ९८२२२६९७३३ ) ,बालाप्रसाद भुतडा ( ९४२२४२६२६८ ) ,उज्वल भुतडा ,वेणूगोपाल चांडक यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post