प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : प्रतिनिधी :
माय फौंडेशन द्वारा आयोजित व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या सहयोगाने, सलग ४५ दिवस चालेल्या माय आत्मनिर्भर बेटी अभियानचा समारोप आज संपन्न झाला. या शिबिराचे हे ४ थे वर्ष होते. सलग ४५ दिवस चालेल्या माय आत्मनिर्भर बेटी अभियान मध्ये मार्शल आटर्स, व्याख्यान, सोशल मीडिया अवेअरनेस, एथिलीट गेम, रनिंग, ट्रेकिंग, सायकलिंग, टीमवर्क विकसित करणे, अभिनय कला, वक्तृत्व स्पर्धा आदिंचा समावेश होता.
समारोप कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. एस.पी. मर्दा हे होते. तसेच रोटरीचे अध्यक्ष सत्यनारायण धूत, सेक्रेटरी प्रकाशजी गौड, माय फौंडेशन चे उपाध्यक्ष श्री श्यामसुंदरजी मर्दा, सेक्रेटरी लक्ष्मीकांत तोष्णीवाल हे होते.
माय फौंडेशनने सुरु केलेल्या ह्या उपक्रमाचे महत्व खूप असून, भविष्यात मुलींच्या साठी अविरत कार्य करणारी संस्था म्हणून ,माय फौंडेशन व रोटरी चा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल, भविष्यात पालकांनी अश्या शिबिरात जास्तीत जास्त मुलींना पाठवावे असे प्रतिपादन डॉ.एस.पी. मर्दा यांनी केले
मुलींनी, लघु नाट्य, मार्शल आर्ट्सचे विविध प्रकार सादर केले. शिबिरात घेतलेल्या स्पर्धेतील यशस्वी मुलींना बक्षिसे देण्यात आली व सर्व मुलींना सर्टिफिकेट व सन्मानचिन्ह देण्यात आले
सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी माय सदस्य गोपाल चांडक, संजय रांदड, नवनीत बांगड, बालाप्रसाद भुतडा, अजित चितलांगिया, दीपक बियाणी व माय फौंडेशन च्या अनेक सदस्यांनी सलग 45 दिवस प्रचंड मेहनत घेतली तसेच सर्व माय फौंडेशन, रोटरीचे पदाधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माय सदस्य दीपक राठी यांनी केले. तर आभार वासुदेव तोतला यांनी मानले.