वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणार : पोलीस उपाधीक्षक समीरसिंग साळवे



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : प्रतिनिधी 

समाजातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबर वाढत्या गुन्हेगारीला आळा घालून ती कमी करण्यावर आपला भर राहील. तसेच एखाद्या भागात जातीय तेढ , धार्मिक वाद घडल्यास त्याचे पडसाद इचलकरंजी शहरात जलद गतीने उमटत असतात. अशा घटनांना वेळीच रोखण्यासह या घटना घडू नयेत याची दक्षता घेतली जाईल ,अशी ग्वाही नूतन पोलीस उपाधीक्षक समीरसिंग साळवे यांनी दिली.        

    इचलकरंजी येथे मागील आठ महिन्यांपासून रिक्त असलेल्या पोलीस उपाधीक्षक पदावर समीरसिंग  साळवे यांची  नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून स्थानिक पत्रकारांशी सुसंवाद साधला. 

पोलीस उपाधीक्षक साळवे यांनी यापूर्वी सोलापूर , मनमाड , नाशिक , गडचिरोली या ठिकाणी पोलीस उपाधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळला आहे. तर गडचिरोलीत असताना त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.नशीले पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्याचे श्री.साळवे यांनी सांगितले. शहरात कायमस्वरूपी स्ट्रायकिंग फोर्स असावी यासाठी आपण जिल्हा पोलीस प्रमुखांकडे मागणी केली आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लवकरच शहरात स्ट्रायकिंग फोर्सची तुकडी तैनात होईल ,असेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post