प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज सोमवार दि. २६ जून रोजी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त शहरातील कोल्हापूर रोडवरील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुर्णा कृती पुतळ्यास उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी माजी शिक्षण सभापती मनोज साळुंखे, कामगार अधिकारी विजय राजापुरे, जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, उद्यान पर्यवेक्षक सुनिल बेलेकर, वृक्ष अधिकारी संपत चव्हाण, स्वच्छता निरीक्षक संजय भोईटे, विजय कोळी, रामचंद्र कांबळे, सदाशिव शिंदे, गणेश शिंदे, संजय शेटे, संजय सुभेदार, प्रदीप झंबरी, संजय कांबळे, सुभाष आवळे, सचिन शेडबाळे,मनोज खंदारे, दिलीप मगदूम आदी उपस्थित होते.