माणुसकी फौंडेशनचे चैतन्य चव्हाण रोटरी युवा गौरव पुरस्काराने सन्मानित

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : प्रतिनिधी 

येथील रोटरी क्लब ऑफ टेक्सटाईल सिटी ,रोटरी क्लब ऑफ एक्झिक्युटिव्ह व रोटरी क्लब अतिग्रे यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल माणुसकी फौंडेशनचे सेवाव्रती चैतन्य संजय चव्हाण यांना रोटरी युवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या पुरस्काराचे वितरण रोटरीचे प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

रोटरी या संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकांना रोटरी युवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.यंदाच्या वर्षी माणुसकी फौंडेशनचे सेवाव्रती चैतन्य चव्हाण यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल युवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी मैञयी खोत ( शैक्षणिक ) ,सलोनी कबाडे ( सांस्कृतिक ) , प्रमोद माळी ( पर्यावरण ) ,शुभम निंगुडगेकर (हाॅटेल मॅनेजमेंट ) , संकेत पाटणी ( पञकारिता ) , निलेश पाटील ( सामाजिक ) ,आयुषी जैन - कासलीवाल ( योग प्रचार - प्रसार ) , ज्ञानेश्वर माने ( प्रबोधन ) यांनाही उल्लेखनीय कार्याबद्दल युवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

येथील रोटरी दगडूलाल मर्दा मानव‌ सेवा केंद्रामध्ये झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यास रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल प्रा.डॉ.प्रशांत कांबळे ,रोटरी क्लब टेक्सटाईल सिटीच्या अध्यक्षा सौ.दिप्ती मराठे , सेक्रेटरी प्रकाश लाहोटी ,रोटरी क्लब एक्झिक्युटिव्हचे अध्यक्ष संदीप कल्याणकर , सेक्रेटरी संतोष पाटील ,रोटरी क्लब अतिग्रेच्या अध्यक्षा यास्मिन मणेर , सेक्रेटरी डॉ.शर्मिला साबळे , माणुसकी फौंडेशनचे संस्थापक रवी जावळे यांच्यासह विविध मान्यवर , पदाधिकारी ,सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post