प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी नगरपालिकेचे इचलकरंजी महानगरपालिकेत रूपांतर झाले नंतर इचलकरंजी महानगरपालिकेसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांचा नव्याने आकृतीबंध आणि त्या अनुषंगाने सदर सर्व पदांसाठी सेवा प्रवेश मंजूर करणेत आलेला आहे.
सदर सेवा प्रवेशाच्या अनुषंगाने आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांनी इचलकरंजी महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठता आणि शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती दिली.
या मध्ये उप अभियंता (स्थापत्य)पदी सुभाष देशपांडे, समाज कल्याण अधिकारी पदी विकास विरकर आणि कामगार अधिकारी पदी विजय राजापुरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक पदी संजय हातळगे, विश्वास हेगडे, मंगेश दुरुघकर, संजय भोईटे यांचेसह सफाई कामगार संवर्गातील स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ५ कर्मचाऱ्यांना स्वच्छता निरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली आहे.
लिपिक संवर्गातील १६ पात्र कर्मचाऱ्यांना वरिष्ठ लिपिक पदी पदोन्नती देण्यात आली आहे, त्याचबरोबर चतुर्थ वर्गातील ७५ कर्मचाऱ्यांना लिपिक पदी पदोन्नती देण्यात आली आहे.