भाजप महिला मोर्चा आघाडीचे शिवाजीनगर पोलीस ठाण्यास निवेदन सादर
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : प्रतिनिधी :
भाजपच्या महिला नेत्या चिञा वाघ यांच्या संदर्भात बदनामीकारक मजकूर टाकणारे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी,अशा मागणीचे निवेदन इचलकरंजी भाजप महिला मोर्चाच्या वतीने शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सत्यवान हाके यांना सादर करण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की ,समाजात महिला सबलीकरण तसेच सामाजिक ,आर्थिक स्तरावर महिलांना सक्षम करण्याचे , त्यांना मिळवून देण्याचे काम भाजप महिला मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे.सध्या भाजप प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रकार राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड हे करत आहेत. श्री.आव्हाड यांनी चित्रा वाघ यांच्या संदर्भात बदनामकारक मजकूर ट्विटवर अपलोड केला आहे.यातून चित्रा वाघ यांची मानहानी करण्याचा, त्यांना बदनाम करण्याचा तसेच त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा आणि सामाजिक जीवनातून उठविण्याचा प्रकार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रात महिलांच्या चारित्र्यावर शिंतोंडे उडवले जात आहेत, हे आम्ही कदापिही सहन करणार नाही.त्यामुळे भाजप महिला नेत्या चित्रा वाघ यांची ट्विटरवरून बदनामी, मानहानी केल्याप्रकरणी आणि बदनामीकारक मजकूर ट्विटरवर टाकल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी ,अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
निवेदन सादर करणा-या शिष्टमंडळात इचलकरंजी शहर भाजप महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ.पूनम जाधव ,भाजप शहराध्यक्ष ॲड.अनिल डाळ्या ,भाजप मिडिया प्रभारी उमाकांत दाभोळे ,सौ.सरला घोरपडे ,सौ.नीता भोसले , सौ.योगिता दाभोळे , सौ.निर्मला मोरे , सौ.माधवी मुंडे , सौ.सुषमा पाटील , सौ.छाया तोडकर , सौ.शबाना शहा , सौ.पूजा बेडगकर , सौ.संगीता घोरपडे , सौ.बबिता माने आदींसह महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.