राजर्षी शाहू हायस्कूल माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : प्रतिनिधी :

येथील राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूलचा सहावा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात पार पडला. यशवंत मंगल कार्यालयात झालेल्या या मेळाव्यात शाळेच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. आजी माजी शिक्षकांची उपस्थिती या मेळाव्याचे केंद्रबिंदू ठरले. अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष वसंतराव सपकाळे हे होते.

   प्रारंभी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यानंतर स्वागत महिला प्रतिनिधी शैला गायकवाड यांनी केले. तर प्रास्ताविक इराण्णा सिंहासने यांनी केले. यावेळी माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.  बी. बी. हुपरे, वैशाली नाईकवाडे, मुख्याध्यापक एस. बी. पोवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील जुन्या आठवणींमध्ये रमले. एकमेकांशी त्यांनी संवाद साधून शालेय जीवनातील विविध प्रसंगांना उजाळा दिला. यानंतर माजी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

   कार्यक्रम यशस्वीतेसाठी जीवन बरगे, नेताजी बिरंजे, मुकुंद तारळेकर, प्रमोद इदाते, अभिनंदन तेलनाडे, नीलम मराठे, सुवर्णा पवार, जीवन पोतदार, बद्रेआलम देसाई, जाफर जिडगे, रसिका  रफिक मुल्ला, अनिल लोकरे, अर्चना सामंत, विजय हावळ, प्रमोद मुसळे, हरीश कांबळे, दत्ता डंबाळ, अनिल सारडा, गीता वागदरी, अरुण कांबळे यांच्यासह माजी विद्यार्थी संघाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

या मेळाव्यात गेल्या ५० वर्षातील माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध बॅचेसचे सुमारे १३०० माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post