प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज मंगळवार दि. ६ जून २०२३ रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याराज्याभिषेक दिना निमित्त शहरातील शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास तसेच छत्रपती शिवाजी उद्यानातील महाराजांच्या अर्ध पुतळ्यास त्याच बरोबर कॉ. के.एल. मलाबादे चौकामधील राज्याभिषेक सोहळा डिजिटल फलकास आमदार प्रकाश आवाडे आणि प्रशासक तथा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हस्ते आणि माजी आमदार सुरेशराव हाळवणकर आणि उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करणेत आले.
राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाड्याचे सादरीकरण शहरातील प्रसिद्ध शाहिर गंगाराम नलवडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.
याप्रसंगी प्रभारी उपायुक्त केतन गुजर, शिवाजीनगर पोलिस निरीक्षक सत्यवान हाके, शिवतीर्थ समिती अध्यक्ष पुंडलिकभाऊ जाधव, जेष्ठ माजी नगरसेवक अजितमामा जाधव, माजी उपनगराध्यक्ष संजय कांबळे, माजी सभापती नितिन जांभळे, कामगार अधिकारी विजय राजापुरे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, विद्युत अभियंता संदीप जाधव, मुख्य लेखापरीक्षक दिलीप हराळे, क्रिडा अधिकारी शंकर पोवार, नाट्यगृह व्यवस्थापक प्रताप पवार, अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, उद्यान पर्यवेक्षक सुनिल बेलेकर, वृक्ष अधिकारी संपत चव्हाण, खरेदी पर्यवेक्षक शितल पाटील, जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, स्वच्छता निरीक्षक संजय भोईटे, महादेव मिसाळ, सहा.क्रिडा अधिकारी संजय कांबळे, संजय शेटे, सुजाता दाभोळे, दिलीप मगदूम, सचिन शेडबाळे, आनंदा मकोटे आदी उपस्थित होते.