प्रेस मीडिया लाईव्ह :
कामगार ,कष्टकरी ,श्रमिक वर्गाला घामाचा योग्य दाम मिळालाच पाहिजे , त्यांचे शोषण थांबून आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचावण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने रस्त्यावरची लढाई करणारा कष्टक-यांचा बुलंद आवाज म्हणजेच महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाचे निष्ठावंत मावळे , गडहिंग्लज तालुक्यातील बटकणंगले गावचे लोकनियुक्त सरपंच ,आमचे मार्गदर्शक आदरणीय धोंडिबा कुंभार साहेब...कष्टकऱ्यांची नगरी म्हणून ओळख असलेल्या वस्ञनगरीत मिळेल ते काम करतच त्यांनी एम.ए.पदवीचे शिक्षण पूर्ण केले...यानंतर लक्ष्मी - विष्णू बॅंकेमध्ये क्लार्क ,कॅशियर अशा पदांवर अत्यंत प्रामाणिकपणे काम केले.याच दरम्यान , प्रस्थापित भांडवलदार वर्गाकडून कामगार , कष्टकरी वर्गावर होणारा मोठा अन्याय ,अत्याचाराची जाणीव झाल्याने या विरोधात संघटीत लढा उभारुन अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील सामाजिक व कामगार चळवळीतील जेष्ठ व अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे आदरणीय अतुल दिघे यांच्या नेतृत्वाखाली सर्व श्रमिक महासंघ या संघटनेत सक्रिय सहभाग घेतला.त्यामुळे कामगार व सामाजिक समस्यांच्या मुळाशी जाऊन सर्व बाजूंनी अभ्यास करत त्यावर उपाययोजना करणे ,समता प्रस्थापित करणे , वंचित व उपेक्षित घटकांना समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे अशा कामात झोकून देऊन कार्यरत राहणे हीच त्यांची लढाऊ वृत्ती दिवसेंदिवस विकसित होत राहिली.त्यामुळे साहजिकच कामगार व सामाजिक परिवर्तन चळवळीला अधिक बळ मिळाले,असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरु नये.
सामाजिक परिवर्तन चळवळीतील अभ्यासू व्यक्तीमत्व आदरणीय ज्येष्ठ कामगार नेते अतुल दिघे साहेब व अन्य सहका-यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी यंञमाग , बांधकाम या क्षेत्रातील कामगारांबरोबरच अंगणवाडी , घरेलू कामगार , आरोग्य सेविका यांच्या न्याय हक्कासाठी ते राञं दिवस लढत असतात... विविध सामाजिक व ज्वलंत विषयांचीअभ्यासपूर्ण मांडणी व संघटन कौशल्याच्या जोरावर त्यांनी अनेकांना न्याय देण्याची भूमिका घेत सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला बळ देत आपल्या निरपेक्ष ध्येयनिष्ठ कार्याचा आदर्श वस्तुपाठ समाजासमोर घालून दिला आहे .याचाच परिणाम म्हणजे आज बटकणंगले गावाने मोठ्या विश्वासाने त्यांना सरपंच पदावर बसवून गावच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचे सकारात्मक पाऊल टाकले आहे.गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत लोकनियुक्त सरपंच धोंडिबा कुंभार यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे नूतनीकरण पाईप लाईन दुरुस्त करुन पाणी गळती थांबवणे , गटारी व रस्त्यांची नियमित स्वच्छता , शासकीय योजनांविषयी भित्तीपत्रकांतून जनजागृती , दर्जेदार रस्ते दुरुस्ती व डांबरीकरण अशी बहुतांश कामे पूर्ण केली आहेत तर काही कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.अशा विविध विकासकामांतून बटकणंगले गांवचा अगदी चेहरामोहराच बदलत आहे.त्यामुळे साहजिकच ग्रामस्थांनी त्यांच्यावर सरपंच पदासाठी टाकलेला विश्वास सार्थ ठरत आहे.मुळातच अगदी निरपेक्ष भावनेने व तळमळीने समाज विकासासाठी काम करणारी व वेळप्रसंगी भ्रष्ट व्यवस्थेशी लढण्याची धमक असणारे पारदर्शी ,
अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून धोंडिबा कुंभार यांना ओळखले जाते.त्यामुळेच त्यांच्या कामाची धडाडी ,सहका-यांना सोबत व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन काम करण्याची हातोटी ही बटकणंगले गावचा सर्वांगीण विकास साधणारी ठरेल ,हा विश्वास नक्कीच सार्थ ठरेल.पारदर्शी व निरपेक्ष भावनेने
काम करणारा लोकप्रतिनिधी सर्वांना सोबत घेऊन भरीव विकास कार्य करु शकतो ,याचे आदर्श उदाहरण म्हणजेच लोकनियुक्त सरपंच धोंडिबा कुंभार यांच्याकडे अगदी अभिमानाने पहावे लागेल. त्यांच्या सामाजिक व लोकाभिमुख कार्यातून निकोप समाज निर्मितीच्या कार्याला आणखी पाठबळ मिळत राहो ,याच त्यांना आजच्या वाढदिवसाच्या उदंड व मनस्वी शुभेच्छा !
- सागर बाणदार