प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : प्रतिनिधी :
मोदी सरकारच्या च्या 9 वर्षा काळातील योजनाबद्दल जेष्ठ नागरिक समाधानी , मोदी @9 कार्यक्रम अंतर्गत पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी सरकारला यशस्वी सुशासनाला नऊ वर्षे पुर्ण झाले बद्दल इचलकरंजी भारतीय जनता पार्टी वतीने इचलकरंजी विधानसभा परिसरातील "ज्येष्ठ नागरिकांचे जनसंपर्क संमेलन" भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री.सुरेशराव हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष व भाजपा शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांच्या उपस्थितीत भाजपा शहर कार्यालय इचलकरंजी येथे संपन्न झाले
या संमेलनाच्या दरम्यान मोदी @9 अंतर्गत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सरकारच्या नऊ वर्ष सुशासन कार्यकाळातील लोकभिमुक लोकप्रिय योजनांची माहिती ज्येष्ठ नागरिकांना देत संवाद साधला .या संवाद संमेलनावेळी स्वातंत्र्य पूर्व व स्वातंत्र्य नंतरच्या काळातील आठवणीना उजाळा दिला तसेच देशात आणीबाणी लागलेल्या काळातील कटू अनुभव कथन केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या २०१४ नंतर योजनांच्या व गेल्या 50 वर्षातील योजनांच्यावर तुलनात्मक चर्चा करत ज्येष्ठ नागरिकांनी मोदी सरकारच्या लोकभिमुक योजनांच्या बद्दल सकारात्मक प्रतिक्रिया देत समाधान व्यक्त केले. जेष्ठ नागरिक संमेलन वेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री. सुरेशराव हाळवणकर यांनी संवाद साधत असताना सर्वसामान्य तसेच ज्येष्ठ,शेतकरी,महिला भगिनी यांच्यासाठी ज्या योजना मोदी सरकारने राबवल्या त्याची सविस्तर माहिती दिली. याच बरोबर शहराध्यक्ष मा.श्री.आनिल डाळ्या यांनीही ज्येष्ठ नागरिकांनाच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांच्यासाठी असणाऱ्या योजनांचा पुरेपूर लाभ देण्याचा विश्वास दिला. यावेळी मा.गुरुवर्य महाजन गुरुजी यांच्यासह जेष्ठ नेते मिश्रीलाल जाजू, मार्गदर्शन केले. संमेलनाचे नियोजन धोंडीराम जावळे,दिपक राशिनकर, पांडुरंग म्हातुकडे यांनी केले. यावेळी जवाहर छाबडा ,सीताराम ओझा,शिरकाईदेवी ज्येष्ठ नागरिक संस्था अध्यक्ष अशोक पाटील यांच्यासह संस्थेची इतर पदाधिकारी इचलकरंजी शहर परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .