इचलकरंजी : २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणेत येणार - --प्रशासक तथा आयुक्त सुधाकर देशमुख.


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने  आर्ट ऑफ लिव्हिंग, कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद आणि पतंजली योग समिती यांच्या सहकार्याने बुधवार दि. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणेत येणार - --प्रशासक तथा आयुक्त सुधाकर देशमुख.

   बुधवार दि.२१ जून  रोजी होणाऱ्या  आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने  आर्ट ऑफ लिव्हिंग इचलकरंजी, कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद इचलकरंजी आणि पतंजली योग समिती इचलकरंजी  यांच्या सहकार्याने  राजाराम स्टेडियम येथे सकाळी ७ वाजता योग दिवस साजरा करण्यात येणार आहे.

 या उपक्रमाच्या अनुषंगाने योग प्रशिक्षकांच्याकडून योग, प्राणायाम, तसेच ध्यान ईत्यादी बाबींची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. 

         योग,प्राणायाम, ध्यान यामुळे तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होते त्याचबरोबर निरोगी आयुष्यासाठी योगाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने शहरवासीयांनी बुधवार  दि.२१ जून रोजी सकाळी ७ वाजता राजाराम स्टेडियम येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त सुधाकर देशमुख  यांचे कडून करणेत येत आहे.


   

Post a Comment

Previous Post Next Post