माहेश्वरी युथ फौंडेशनच्या वतीने खेळाडू मुलीस सायकल वितरण



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : प्रतिनिधी : 

येथील माहेश्वरी युथ फौंडेशनच्या वतीने माय सायकल - री सायकल उपक्रमांतर्गत जयहिंद मंडळच्या खेळाडू मुलीस मोफत सायकल वितरण करण्यात आले..

येथील  माय फौंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवण्यात येतात.याशिवाय माय सायकल-री सायकल उपक्रमांतर्गत गरजू विद्यार्थीनींना मोफत सायकल वितरण करण्यात येते.तसेच खेळाडू मुलींना नवीन सायकल वितरण करुन सामाजिक बांधिलकी जोपासली जाते.

हा उपक्रम गेल्या 2  वर्षांपासून राबवण्यात येत आहे. संस्थेच्या वतीने सध्या कन्या महाविद्यालयात माय-सायकल बँकची सुद्धा स्थापना करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षीही जयहिंद मंडळच्या खेळाडू मुलीस  मोफत सायकल वितरण करुन तिला पुढील शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील वाटचालीस प्रोत्साहन देण्यात आले. 

यावेळी माय फौंडेशनचे बालाप्रसाद भुतडा , गोपाळ चांडक यांच्यासह जयहिंद मंडळचे पदाधिकारी , प्रशिक्षक व खेळाडू उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post