प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : प्रतिनिधी
माणकापूर ( ता. निपाणी )येथील जैन समाजातील प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक व माजी ग्रा.पं.सदस्य अण्णासो देवेंद्र चौगुले (वय ७२) यांचे बुधवार दि.२१ जून रोजी पहाटे ६ वा. अल्पशा आजाराने निधन झाले.
अण्णासो देवेंद्र चौगुले यांनी माणकापूर गावामध्ये सर्वप्रथम सार्वजनिक पिण्याच्या पाणी पुरवठा योजनेसाठी पंचगंगा नदीशेजारी जॅकवेल बांधकाम करण्यासाठी आपल्या स्वतः च्या शेतामध्ये १० गुंठे जमीन
दान दिली आहे. त्यामुळे त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
माणकापूरचे माजी सरपंच व विद्यमान ग्रा.पं. सदस्य अभय चौगुले यांचे ते वडील व माजी ग्रा.पं.सदस्या- ललिता चौगुले यांचे ते पती होत. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले, १ मुलगी- जावई, सुना- नातवंडे असा मोठा परिवार आहे.