इचलकरंजी : आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.



प्रेस मीडिया लाईव्ह :

        इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने  आर्ट ऑफ लिव्हिंग इचलकरंजी, कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद इचलकरंजी आणि पतंजली योग समिती इचलकरंजी यांच्या सहकार्याने  आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

   


    आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज बुधवार  दि. २१ जून रोजी इचलकरंजी महानगरपालिकेच्या  वतीने  आर्ट ऑफ लिव्हिंग इचलकरंजी, कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद इचलकरंजी आणि पतंजली योग समिती इचलकरंजी यांच्या सहकार्याने महानगरपालिकेच्या राजाराम स्टेडियम येथे योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करणेत आला. यामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक विनायक मुरदंडे आणि कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद इचलकरंजीचे  सुहास पवळे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी योग, प्राणायाम, तसेच ध्यान ईत्यादी बाबींची प्रात्यक्षिके सादर केली. 

         योग,प्राणायाम, ध्यान यामुळे तणावमुक्त जीवन जगण्यास मदत होते त्याचबरोबर निरोगी आयुष्यासाठी योगाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने महानगरपालिकेच्या आवाहना नुसार शहरवासीयांनी त्याचबरोबरच महानगरपालिकेचे शाहू हायस्कूल, गर्ल्स हायस्कूल, दत्ताजीराव कदम ए.एस.सी. महाविद्यालय, गोविंदराव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, रामभाऊ जगताप हायस्कूलचे आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी राजाराम स्टेडियम येथे मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

आजच्या या कार्यक्रमासाठी  आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख,माजी आमदार सुरेश हाळवणकर, अप्पर तहसीलदार मनोजकुमार ऐतवडे, पोलिस निरीक्षक सत्यवान हाके, विकास अडसूळ, कामगार अधिकारी विजय राजापुरे, क्रिडा अधिकारी शंकर पोवार, उद्योजक शामसुंदर मर्दा, सुरेश जाजु, अनिल डाळ्या, पांडुरंग मेटे, रवीकुमार शर्मा, राहुल रायनाडे, नारायण जोशी, राजेंद्र गवळी, वैशाली नायकवडे, महिला बाल कल्याण अधिकारी सीमा धुमाळ, नमिता खोत मोहन विरकर, चंद्रकांत कोरे, तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग इचलकरंजी, कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद इचलकरंजी आणि पतंजली योग समिती इचलकरंजी यांचे प्रतिनिधी यांचेसह   विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 


   

Post a Comment

Previous Post Next Post