इचलकरंजी शहराचा विकास होणेच्या दृष्टीने काही कठोर निर्णय घ्यावे लागतील : आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख
प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे
इचलकरंजी महानगरपालिकेचे प्रथम आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांची नुकतीच नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुंबई येथे पदोपदी वर नियुक्ती झालेली आहे . या निमित्त महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने त्यांचा निरोप समारंभाचे आयोजन महानगरपालिका उपायुक्त डॉ प्रदीप ठेंगल यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवार दि.३० रोजी श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृहात करणेत आले होते.
याप्रसंगी पोलिस उप अधीक्षक समीर साळवे, कार्यकारी अभियंता संजय बागडे, शहर अभियंता सुभाष देशपांडे, पोलिस निरीक्षक राजु ताशिलदार, माजी नगरसेवक अजितमामा जाधव, मदनराव कारंडे, सागर चाळके शशांक बावचकर, प्रकाश मोरबाळे, इरफान पटेल आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
यानंतर महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या हस्ते आयुक्त सुधाकर देशमुख यांचा महालक्ष्मीची मूर्ती देवुन सपत्नीक सत्कार करणेत आला.
सत्काराला उत्तर देताना आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांनी इचलकरंजी महानगरपालिके मधील एक वर्षाचा आढावा घेऊन इचलकरंजी शहराचा विकास होणेच्या दृष्टीने काही कठोर निर्णय घ्यावे लागतील असे मनोगत व्यक्त केले.,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कामगार अधिकारी विजय राजापुरे यांनी केले तर शितल पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
सदर कार्यक्रमासाठी अप्पर तहसीलदार मनोजकुमार ऐतवडे, प्र.उपायुक्त केतन गुजर, मुख्य लेखाधिकारी कलावती मिसाळ, माजी सभापती नितिन जांभळे, इक्बाल कलावंत यांचेसहसामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार , महानगरपालिका अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.