मोदी @9 अभियान अंतर्गत "भोपाल रॅली" साठी मा.श्री.राजेंद्र बंडू पाटील यांची इचलकरंजी विधानसभेतून निवड

 



प्रेस मीडिया लाईव्ह : 

 मोदी @9 अभियानांतर्गत "भोपाल रॅली" या संघटनात्मक कामकाजासाठी महाराष्ट्रातून 33 पदाधिकाऱ्यांची आणि संपूर्ण भारतातून 2500 पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे. 

या मध्ये इचलकरंजी विधानसभा विस्तारक मा.श्री.राजेंद्र बंडू पाटील यांची निवड झाली याबद्दल हार्दिक अभिनंदन यासाठी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री.सुरेशरावजी हाळवणकर साहेब आणि इचलकरंजी भाजपा शहराध्यक्ष मा.श्री. अनिलजी डाळ्या साहेब यांचे सहकार्य लाभले मा.श्री.राजेंद्र पाटील हे भाजपा इचलकरंजी विस्तार असून संघटनात्मक कामकाजामध्ये कित्येक वर्ष प्रामाणिक निष्ठेने आणि पक्षासाठी जास्तीत जास्त वेळ देऊन तन आणि मन अर्पण करून कार्य करत आहेत. 

या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांची योग्य निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल अनेक स्तरातून त्यांचे हार्दिक अभिनंदन होत आहे. मा.श्री.राजेंद्र पाटील साहेब दिल्लीला जाऊन पंतप्रधान मा.श्री नरेंद्रजी मोदी साहेबांच्या मिटींगला हजर राहून त्यांनी देतील त्या आदेशाने दिनांक 24/6/2023 ते 07/07/2023 या कालावधीमध्ये कामकाज करतील 

Post a Comment

Previous Post Next Post