प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : श्रीराम मंदिर जन्मोउत्सव मंडळ सातपुते गल्ली पन्नासव्या वर्षपूर्ती निमित्त श्री राम धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक भान ठेवून हुशार व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.सदर उपक्रमांद्वारे एकूण 412 विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप केले.
या उपक्रमास उदंड प्रतिसाद मिळाला एक आनंद ही आहे याचा अभिमान बाळगायचा की समाजात अजून आर्थिक विषमता आहे याचा विचार करायचा..... नक्कीच त्याचा सुद्धा विचार केला प्रभू रामचंद्राच्या कृपेने सर्वांना आर्थिक व बौद्धिक सुबत्ता देवो ह्याच हार्दिक शुभेच्छा सर्व विद्यार्थ्यांना राहतील या कार्यक्रमानिमित्त भागातील चंदू शेठ छाजेड, कोठारी शेठजी, कल्लाप्पाण्णा आवाडे जनता बँकेचे संचालक श्रीशैल कित्तुरे, संजय बिडला ,माजी नगरसेवक संजय जाधव ,अनिलराव कांबळे, घनश्यामजी उरणे,पोपट सातपुते,हरिभाऊ सातपुते,कमलाकर सातपुते, महेश लोखंडे, सचिन सुतार, लालू सातपुते, संजय सातपुते, शिवम सातपुते बंडू उरणे, तसेच मंडळाच्या महिला सदस्य सौ.दीपा सातपुते, सौ.उरणे वहिनी ,सौ.आमने वहिनी,सौ. मकोटे वहिनी ,सौ मेटे काकू ,सौ सातपुते वहिनी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
सदर चा उपक्रम श्रीराम जन्मोउत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी ,कार्यकारणी सदस्य व मंडळाचे अध्यक्ष म्हाळसाकांत कवडे या सर्वांनी अतिशय नियोजनबध्द ,उत्साहात पार पडला .