शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप
प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे
इचलकरंजी महानगरपालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल तसेच रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळा क्रमांक २७ या शाळेंच्या सन २०२३ वर्षासाठी प्रवेशोत्सव व शैक्षणिक साहित्य, गणवेश वाटप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
मा. विकास खारगे साहेब,प्रधान सचिव, मुख्यमंत्री कार्यालय यांच्या सूचनेनुसार आणि आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांच्या आदेशानुसार तसेच उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शना नुसार यावर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले .यासाठी प्र. उपायुक्त केतन गुजर , नगरसचिव विजय राजापुरे , मुख्य लेखाधिकारी कलावती मिसाळ , मुख्य लेखापरीक्षक दिलीप हराळे उपमुख्य लेखाधिकारी करुणा शेळके,किरण मगदूम , रामचंद्र कांबळे,विकास विरकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावर्षीच्या सन २०२३-२४ घ्या शाळा प्रवेशोत्सव समारंभाचे अध्यक्ष प्र.उपायुक्त केतन गुजर , प्रमुख पाहुणे नगरसचिव विजय राजापुरे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे, अमृता भोसले माजी नगरसेवक रवी लोहार माजी नगरसेवक, भारत बोंगार्डे ,वसंत सपकाळे माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष, सुभाष कुराडे शाळा व्यवस्थापन सदस्य, प्रशालेचे मुख्याध्यापक शंकर पोवार, पर्यवेक्षक पी.ए.पाटील , विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक विद्याधर भाट ,अलका शेलार, इचलकरंजी महानगरपालिका शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक राजेंद्र घोडके, किरण दिवटे , संजय देमाण्णा, विष्णू पाटील यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव समारंभ संपन्न झाला.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक शंकर पोवार यांनी केले.
यानंतर नवागतांचे स्वागत प्र.उपायुक्त केतन गुजर व मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन करण्यात आले .त्यानंतर शैक्षणिक साहित्याचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करणेत आले.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इचलकरंजी महानगरपालिकेचे नगरसचिव विजय राजापुरे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आनंदी ,स्वच्छंदी जीवन जगा, खेळा बागडा व आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करत रहा असे आवाहन केले .
माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी जीवनात शाळेला अनन्य साधारण महत्त्व आहे गुरुने दिलेल्या ज्ञानाला आपल्या जीवनात फार महत्त्व आहे त्यामुळे सुरुवातीपासूनच लक्षपूर्वक शिका असे मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्र. उपायुक्त केतन गुजर यांनी मनोगतामध्ये शाळेला आणि विद्यार्थ्यांना महानगरपालिकेच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
आदरणीय आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आवाहनानुसार इचलकरंजी शहरांमध्ये पहिल्या पाच शाळेमध्ये आपली शाळा यावी यासाठी विशेष प्रयत्न करा असे आवाहन करून विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी प्रयत्न करत रहा यश हमखास मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पी. ए. पाटील यांनी केले.