दामदुपटीच्या आमिष दाखविणाऱ्याची कंळबा जेल मध्ये धुलाई.

   दंगल प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या टोळक्या कडुन मारहाण                  




प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : 

   कोल्हापूर- दामदुपटीचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्या प्रकरणी सध्या कंळबा कारागृहात संशयीत आरोपी विश्वास कोळी याला कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या टोळक्यानी बेदम मारहाण केली.मारहाण करणारे दंगलीच्या गुन्हयात कंळबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते.

 विश्वास कोळी यानी कमीवेळेत गुंतवणूकीवर दामदुप्पटीचे आमिष दाखविले होते.या गुन्हयातील संशयीत आरोपी कोळी कंळबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.7 जूनला झालेल्या दंगलीतील काही संशयीत तरुणांची रवानगी कंळबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत झाली आहे.त्या वेळी कोळी आणि हे तरुण एकाच बराक मध्ये होते.यातील काही तरुणांनी कोळीच्या मदतीने गुंतवणूक केली होती.त्यानी कोळीला गुंतवणूक केलेल्या रक्क्मेचा जाब विचारला आणि कारागृहातच बेदम मारहाण केली.शेवटी कोळीने जामीनावर सुटल्यावर गुंतवलेली रक्क्म परत देण्याची कबुली त्या तरुणांना दिली.                                          

कोळीकडुन मोक्यातील गुंडाशी मदतीसाठी संधान साधले गेल्याच आठवड्यात जामीनावर सुटका झालेल्या त्या गुंडाला कारागृहातुनच फोन करून मध्यस्थी करण्याची मागणी केली.गुंतविलेली रक्क्म मागणारयांना गुंडाची भिती घालण्याचे नियोजन कोळी यानी केल्याची माहिती काही गुंतवणूकदारांनी दिली.कारागृहात मोबाईलचा वापर कारागृहातीलच काही अधिकारयांच्या मदतीने कोळी मोबाईलचा वापर करत नातेवांईक आणि काही एंजटशी संपर्क साधत असल्याचा प्रकार समोर आला आहे.याबाबत न्यायालयीन कोठडीतील तरुणांनी कारागृहातील अधिकारयांकडे तक्रार केली असून न्यायालयात ही तक्रार अर्ज दिला जाणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post