जन्मदात्या बापा कडुन मुलाचा खून

 आर्थिक वादातुन खून झाल्याची शक्यता ..? वडिलासह तिघेजण ताब्यात.                             

  प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे : 

 इंचलकरंजी -हातकंणले तालुक्यातील तारदाळ येथील जन्मदात्या बापाकडुन साथीदारांच्या मदतीने मुलाचा खून केला.हा खून आर्थिक वादातुन झाल्याची गावात चर्चा सुरू आहे.राहूल दिलीप कोळी(वय 31,कोळी गल्ली तारदाळ).असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.या प्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वडील दिलीप कोळी यांच्यासह विकास पवार(तारदाळ).सतीश कांबळे (तमदलगे).या दोघांना शहापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता या घटनेचा उलगडा झाला.

अधिक माहिती अशी की,गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास तारदाळ हद्दित रेल्वे रुळावर एका युवकाचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी घटना स्थळी जाऊन तपास सुरु केला.याबाबत त्याच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता जबाबात विसंगती आढ़ळल्याने वडील दिलीप आणि मयताचा मोठा भाऊ सचिन यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यानी कौटुंबिक वादातून अन्य दोघांच्या मदतीने राहूलचा खून केल्याचे सांगितले.राहूल हा मद्यपा असल्याने त्याची पत्नी वारंवार होणारया त्रासाला कंटाळून मुलासह माहेरी रहाते.राहूलचे वडील आणि मोठ्या भावाने गावात असलेली जमीन विक्रीस काढ़ली होती.त्याला राहूल चा विरोध होता.माझ्या वाटणीची जमीन विकायची नाही म्हणून राहूल दारु पिऊन त्यांच्याशी वाद घालत शिव्याही देत असे त्यातून हा खून झाल्याची गावात दबक्या आवाजात चर्चा आहे. घटना स्थळी अप्पर पोलिस अधीक्षक श्री.निकेश खाटमोडे -पाटील ,उपअधीक्षक श्री.समीरसिंह साळवे यांनी पाहणी करून तपासाच्या सूचना दिल्या.अधिक तपास शहापूर पोलिस करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post