प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
चंदगड - येथील प्रसिध्द व्यावसायिक संतोष शिंदे यांनी शनिवारी रात्री आपल्या पत्नी मुला समवेत आत्महत्या केली होती.या प्रकरणी तेथील माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि तिचा प्रियकर असलेला पोलिस अधिकारी राहुल राऊत हे दोघे घटना घडल्या पासून फरार होते .
गडहिग्लज पोलिसांनी या दोघांना रविवारी रात्री सोलापूर येथून अटक केली.त्याना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.अन्य फरारी असलेल्यांचा पोलिस शोध घेत आहेत.