प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-गेल्या बुधवारी निवृत्ती चौकात झालेल्या तलवार हल्ला प्रकरणातील आरोपीना आज कोर्टात हजर केले असता त्यांना गुरुवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.यामध्ये युवराज शेळके ,कृष्णात बोडेकर ,केदार घुर्के ,करण शेळके ,राहुल हेगडे ,राजू बोडके (सर्व रा.लक्षतीर्थ वसाहत).यांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली होती.
वाढदिवसाचा फलक फाडल्याच्या कारणावरुन गेल्या वर्षी पासून त्याच्यांत वाद सुरु होता.गेल्या वर्षी प्रकाश बोडके यांने संतोष बोडकेवर तलवार हल्ला केला होता.याचा राग संतोष बोडके गटात होता.सध्या संतोष बोडके येरवडा कारागृहात बंदी आहे.पण त्याच्या गटातील तरुणांनी प्रकाश बोडकेवर बुधवारी हल्ला केला होता.या गुन्हयाचा तपास जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीशकुमार गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.