पुणे : येवलेवाडी येथे 63 वा महाराष्ट्र दिन वर्धापन सोहळा संपन्न


प्रेस मीडिया लाईव्ह :

येवलेवाडी येथे आज दिनांक एक मे 2023 रोजी नवजीवन अंध अपंग कल्याण मंडळ संचालित प्रशिक्षण केंद्र येवलेवाडी येथे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा करण्यात आला.


राष्ट्रपती पदक विजेते माननीय श्री प्रकाश पाटील, ज्येष्ठ समाजसेवक माननीय श्री मुक्तार भाई सय्यद, सोल्जर आय यु फाउंडेशन माननीय श्री. तुषार बाळासाहेब कदम हे सन्माननीय पाहुणे उपस्थित होते.

यावेळी ध्वजारोहण राष्ट्रगीत, राज्य गीत म्हणण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीता गायली, महाराष्ट्र निर्मिती या वर भाषण विद्यार्थ्यांनी केली. यावेळी कार्यशाळेतील सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन - अंजना नारायणे यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री अशोक जाधव यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post