दीड हजार कोटींचे अमली पदार्थ केले नष्ट



प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

नवी  मुंबईतील तळोजा येथे अमली पदार्थांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया पडली पार नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो, डीआयआर आणि कस्टम विभागाने मुंबईसह राज्यभरात कारवाई करून जप्त करण्यात आलेला दीड हजार कोटी रुपयांचा अमली पदार्थ मुंबई सीमाशुल्क प्रतिबंधक आयुक्तालयाच्या उच्चस्तरीय औषध निर्मूलन समितीच्या उपस्थितीत शुक्रवारी नवी मुंबईतील तळोजा येथे नष्ट करण्यात आला आहे.

नष्ट करण्यात आलेल्या अमली पदार्थामध्ये कोकेन, हेरॉइन, एमडी, गांजा, मेंडरेक्सच्या गोळ्या आणि एमडीएमए या प्रकारचे अमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो,डीआयआर आणि मुंबई सीमा शुल्क विभागाने मुंबई सह राज्यभरात हजारों किलोचा अमली पदार्थ जप्त करून अनेक ड्रग्स माफिया, विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

मोठ्या प्रमाणात पकडण्यात आलेल्या अमली पदार्थामध्ये कोकेन,हेरॉइन, एमडी, गांजा, मेंडरेक्सच्या गोळ्या आणि एमडीएमए हा अमली पदार्थचा समावेश होता. जप्त करण्यात आलेला अमली पदार्थ मुंबईतील विविध ठिकाणच्या गोदामात ठेवण्यात आला होता.

Post a Comment

Previous Post Next Post