सांगलीची कु.आकांक्षा कुंभार ठरली सुपर ग्लोबल इंटरनॅशनल माॅडलिंग शोची विजेती



प्रेस मीडिया लाईव्ह :

सांगली :  (प्रतिनिधी) :  

गोवा येथील "साईराज बिच रिसाॅर्ट" येथे दिनांक ७ मे २०२३ रोजी फिल्म फेअर मीडिया प्रोडक्शनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या "ग्लोबल इंटरनॅशनल मॉडलिंग" शोमध्ये सांगली येथील कु.आकांक्षा शामराव कुंभार यांनी विजेतेपद पटकावले. यावेळी सांगली, पुणे, मुंबई, आसाम, गुवाहाटी, केरळ, रशिया, दुबई येथून  मिस, मिसेस आणि किड्स् सहभागी झाले होते. 

यावेळी अनेक महिला मॉडेल यांनी सहभाग नोंदवला होता. परीक्षकांनी अंतिम क्षणी निकाल जाहीर केला. दरम्यान कु.आकांक्षा कुंभार हिचे नाव जाहीर होताच टाळ्यांच्या कडकडाटामध्ये कु.आकांक्षा कुंभार व अन्य विजेत्यांचे सर्वांनी अभिनंदन केले. सांगलीच्या कु.आकांक्षा कुंभार हिने आत्तापर्यंत विविध ठिकाणी आयोजित केलेल्या लावणी, नृत्य व मॉडलिंग शोमध्ये सहभाग नोंदवून विजेतेपद पटकावले आहे. गोवा येथील या स्पर्धेत परीक्षक म्हणून झहीरा शेख, पुनम राऊत, वर्षा जॅकलीन यांनी काम पाहिले. या स्पर्धेचे संयोजन सुरज दोलोई यांनी तर शो डायरेक्टर म्हणून विद्या लठ्ठे- कांबळे (फॅशन कोरिओग्राफर) यांनी काम पाहिले. यावेळी परिक्षक- जाहिरा शेख, पूनम राऊत, वर्षा, जॅक्लिन आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते. 

 नुकत्याच झालेल्या या मॉडलिंग शोमध्ये कु.आकांक्षा कुंभार हिला मिळालेल्या विजेते पदाबद्दल सांगली जिल्ह्यातून व परिसरातून तिचे विशेष अभिनंदन व कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post