"श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज पादुका दर्शन सोहळा"*

 श्री क्षेत्र पंचायतन मंदिराचा प्रथम वर्धापन दिन

प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

 पनवेल :   13 मे 2023 शनिवार रोजी जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या श्री क्षेत्र पंचायतन मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण दिवस विविध सांप्रदायिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

         सकाळी 6.00 वाजता पंचायतन मंदिरांमधील  पूजन आणि आरती करून 9.00 ते 11.00 या वेळेमध्ये कीर्तनाचार्य ह भ प श्री.पांडुरंग महाराज घुले यांचे कीर्तन होणार आहे. सर्व भाविकांसाठी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांचे दर्शन श्री क्षेत्र पंचायतन मंदिर सभागृह येथे सकाळी 11.00 ते सायंकाळी 4.00  वाजेपर्यंत असणार आहे. यादरम्यान  दुपारी 12.00 वाजता येणाऱ्या सर्व भाविकांसाठी महाप्रसाद आणि संगीत चक्रीभजन महोत्सव आयोजित केलेले आहे. दुपारी 3.00 वाजता भजनसंध्याच्या आयोजनानंतर सायंकाळी 5.00 ते 7.00 या वेळेमध्ये श्रींची पालखी मिरवणूक दिंडी सोहळा व हरिपाठ झाल्यानंतर 7.00 वाजता संगीत भजन च्या माध्यमातून वर्धापन दिनाच्या दिवसाची सांगता करण्यात येईल अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी दिली.

कोट

प्रथम वर्धापन दिनानिमित्त श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका प्रथमच श्री क्षेत्र पंचायतन मंदिर, चौक येथे भाविकांना दर्शनासाठी  येणार आहेत. तसेच येणाऱ्या सर्व भक्तांसाठी जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून  दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले आहे यासाठी सर्व भाविकांना आमच्या जे एम म्हात्रे कुटुंबीयांतर्फे आग्रहाचे निमंत्रण:- प्रितम जनार्दन म्हात्रे (अध्यक्ष,जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था)

Post a Comment

Previous Post Next Post