व्हाईस ऑफ मिडीया तर्फे सन्मान



प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

दिल्ली येथे अलिकडेच झालेल्या व्हाईस ऑफ इंडिया च्या राष्ट्रीय अधिवेशनातच व्हाइस ऑफ मिडीयातील विविध पदाधिकाऱ्यांचा, पत्रकारांचा सन्मान राष्ट्रीय अध्यक्ष संपादक संदिप काळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष फिरोज पिंजारी,सौ सरिता महोत्रा यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या वेळी त्यांचे हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी विविध देशांतील कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.व्हाईस ऑफ मिडीया गेली अनेक वर्षे विविध क्षेत्रात कार्यरत असून विविध देशांमध्ये संघटन उभे करुन पत्रकार मित्राच्या न्याय हक्कासाठी  लढा देत आहे .पत्रकारांना  संरक्षण विमा, कर्जाची सुविधा,मुलांच्या शिक्षणाचा खर्च, या उद्देशावर   अहोरात्र  काम सुरू असल्याचे संदिप काळे यांनी अधिवेशनात आपले विचार प्रकट केले.व त्यावेळी विविध देशांतील कार्यकर्ते, पदाधिकारी, पत्रकार तसेच महाराष्ट्रातून तसेच रायगडावरून आलेल्या पत्रकार तसेच रायगड भूषण तथा संपादक,रविंद्र विष्णू जाधव यांचा सन्मान भारताची राजधानी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात कार्यक्रमा च्या वेळी करण्यात आला.रविद्र जाधव हे  हे उच्च शिक्षित असून विविध क्षेत्रातील, पुरस्कार मिळाले असून विविध पदावरती कार्यरत आहेत.सन्मान  मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन सामनाचे संपादक तथा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे हस्ते होऊन  त्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

व्हॉईस ऑफ इंडिया  मिडीयाचा  दिल्ली येथे पुरस्कार प्रदान यावेळी मिडीयाचे संदिप काळे, सौ सरिता महोत्रा, अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला

Post a Comment

Previous Post Next Post