प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील पाले आणि सारडे गावाला १६ मे २०२३ रोजी निपुण भारत अंतर्गत चालत असलेल्या माता गटांसोबत हितगूज करण्यासाठी प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन ची इंटरनॅशनल लेव्हल वर काम करणारी टीमने भेट दिली. प्रत्यक्ष गावात जाऊन माता गट पाहून त्यांच्या सोबत चर्चा केली. निपुण भारत अंतर्गत येत असलेल्या आयडिया व्हिडिओ आणि पहिले पाउलच्या आयडिया व्हिडिओ यांचा मुलांना आणि मातांना कशा प्रकारे उपयोग होत आहे याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली.
गटातील प्रत्येक मातांनी त्यांना आयडिया व्हिडिओचा उपयोग मुलांना शिकविण्यासाठी कशा प्रकारे होत आहे याबद्दल अनुभव सांगितले. मातां अशा म्हणत होत्या की, आम्हाला पूर्वी वाटायचे मुलं फक्त शाळेतच शिकतात परंतु या आयडिया व्हिडिओ मूळे आमचा आत्मविश्वास तर वाढलाच व मुले घरातही परिसरातून चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकतात याची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली. या आयडिया व्हिडिओचा आम्हाला आमच्या दैनंदिन जीवनात ही खूप छान उपयोग होत आहे. आलेल्या व्हिडीओमध्ये गुड टच - बॅड टच , मुलांचे आरोग्य , मुलांचे संतुलित आहार त्याच बरोबर घरातील , परिसरातील वस्तूंच्या सहाय्याने आम्हाला मुलांना शिकवायचे कसे हे समजत आहे. त्याच बरोबर दोन्ही गावचे सरपंच म्हणत होते की, या उपक्रमाचा सर्व गावातील मुलांना खूप उपयोग होत आहे. सारडे गावात शाळा पूर्व तयारी पहिले पाऊल या बाल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आणि त्याप्रसंगी संपूर्ण शाळा सजवण्यात आली आणि मुलांकडून क्रियाकृती करून घेण्यात आल्या आणि सारडे गावातील मातांना प्रथम टीम च्या उबाताई राणे यांनी छान असे मार्गदर्शन केले या भेटीच्या वेळी प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन इंटरनॅशनल टीम च्या मीराताई तेंडुलकर, मीनलताई जोशी, उषाताई राणे, हेमलता ससाणे,सोहेल मेंमोन , वसंत मकवाना, तसेच पाले गावचे सरपंच निराबई पाटील ,माजी उपसरपंच समाधान म्हात्रे, शाळा
व्यवस्थापन कमिटी सर्व सदस्य तसेच सारडे गावचे सरपंच रोशन म्हात्रे व इतर सदस्य, गावचे शिक्षणप्रेमी व उरण गटशिक्षणाधिकारी प्रियांका म्हात्रे व पंचायत समितीची टीम,डायट आधिव्याख्याता संतोष दौड , तसेच राजेंद्र लठ्ठे,पाले शाळेचे मुख्याध्यापक उपेन्द्र ठाकूर आणि सहशिक्षिका पुष्पलता म्हात्रे , कोप्रोली केंद्र प्रमुखा आणि सारडे शाळेच्या मुख्याध्यापिका उर्मिला म्हात्रे, शाळेचे शिक्षक कौशिक ठाकूर, सुनील नऱ्हे,उरण तालुका प्रमुख रणिता ठाकूर , कोकण झोन एसआरजी शलाका पिंगळे, संपूर्ण उरण टीम, पेण तालुका प्रमुख कल्पेश पाटील उपस्थित होते. एकंदरीत दोन्हीही गावचे गावकरी शिक्षणप्रेमी,सारडे विकास मंच आध्यक्ष नागेंद्र म्हात्रे,गावचे शिक्षण प्रेमी गोपाळ म्हात्रे सर इत्यादी उपस्थित होते . तसेच उरण प्रथम टीम ला मार्गदर्शन म्हणून कोकण झोन प्रोग्राम हेड भोजराज क्षीरसागर वेळोवेळी करत आहेत.एकंदरीत ही भेट उरण तालुक्यासाठी ,सर्व माता पालक,विद्यार्थी,व्यवस्थापन कमिटी,गावकरी यांना बरेच काही चांगले देऊन गेली.