मा. सुधीर दत्तात्रेय ठोंबरे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हेल्मेट वाटप कार्यक्रम संपन्न
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे, रायगड परिक्षेत्र तर्फे रस्ता सुरक्षा व हेल्मेट जनजागृती अभियान - २०२३ अंतर्गत मा. सुधीर दत्तात्रेय ठोंबरे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हेल्मेट वाटप कार्यक्रम संपन्न झाला.संकल्पना मा.डॉ.रविंद्र कुमार सिंगल साहेब, अपर पोलीस महासंचालक, वाहतुक महाराष्ट्र राज्य, मुंबई
मार्गदर्शक
मा. श्री. तानाजी चिखले सर पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस, रायगड परिक्षेत्र , मा.श्री. संदीप भागडीकर साहेब पोलीस उप अधीक्षक, महामार्ग पोलीस, रायगड विभाग , मा.श्री. सुधीर दत्तात्रेय ठोंबरे (सामाजिक कार्यकर्ते)
प्रमुख उपस्थिती
मा. श्रीमती गौरी मोरे मॅडम पोलीस निरीक्षक महामार्ग पोलीस, पनवेल विभाग
विशेष सहकार्य ...
मा. रितुताई सुधीर ठोंबरे (सरपंच, चौक, ता, खालापुर) , मा. श्री. गणेश बुरकुल प्रभारी, पोलीस उप निरीक्षक महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे,मुंबई जुना पुना हवे रोड चौक फाटा खालापूर तालुक्यातील हातनोली गावचे गोरगरी गरीब यांचे कैवारी दानशूर नेतृत्व असलेले असे श्री सुधीर शेठ व त्यांची मुलगी सरपंच चौक ग्रुप ग्राम पंचायत आज त्याने समाज उपयोगी 200 हेल्मेट मोफत वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला वरील प्रमाणे व खालील प्रमाणे पोलीस अधिकारी पत्रकार सामाजिक कार्यकर्ते मृत्युंजय दू त तसेच ट्राफिक हवालदार मोठ्या संख्येने उपस्थित होते .व त्यांचा सत्कार करण्यात आला.
सुधीर शेठ ठोंबरे यावेळी भाषण करत असताना त्यांनी पुढील संकल्पना सुचविल्या त्या अशा की दान फाटा चौक खालापूर खोपोली या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मी करून देईन तसेच एक त्यांनी महत्त्वाची सूचना यामध्ये दिली आहे की या रस्त्यावरून अवजड वाहने ट्रक कंटेनर ट्रेलर मोठ्या प्रमाणात वर्दल असून या चालकासोबत किन्नर नसल्यामुळे वाहन चालवणे ड्रायव्हरला जिकरीचे होत असून एक्सीडेंट होण्याची दाट शक्यता आहे असे संबंधित पोलीस अधिकारी यांना सांगण्यात आले
मा.श्री.गुरुनाथ साठेलकर, अध्यक्ष, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, खोपोली दिनांक १६/०५/२०२३ रोजी सकाळी ठिकाण- जुना मुंबई पुणे महामार्ग क्र. ४८, चौक- कर्जत फाटा, ता.खालापुर, जि. रायगड येते कार्यक्रम पार पाडण्यात आले