गिरीश गांधी यांचा दि. १७ मे रोजी पुण्यात 'कृतज्ञता सन्मान सोहळा'



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत गिरीश गांधी (नागपूर) यांच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त 'कृतज्ञता सन्मान सोहळा' बुधवार दि. १७ मे २०२३ रोजी सायं. ०५.३० वाजता पुण्यात एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

 महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे याचे आयोजन करण्यात आले आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार असून स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुपचे अध्यक्ष संदीप वासलेकर यांच्या शुभहस्ते सत्कार समारंभ संपन्न होईल. महाराष्ट्र विधानसभा कॉंग्रेस पक्षनेते  बाळासाहेब थोरात हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. माजी खासदार श्रीनिवास पाटील आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची सन्माननीय उपस्थिती याप्रसंगी असेल. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी.पाटील आणि डॉ. विखे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष  डॉ. अशोक विखे पाटील हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील अशी माहिती सचिन ईटकर व सुनील महाजन, यांनी संयोजन समितीच्या वतीने दिली.


सचिन ईटकर    -   8888879120                                                                                                 

सुनील महाजन -  9371010432

Post a Comment

Previous Post Next Post