कोतवाल चालवतोय तहसील कार्यालयाचा कारभार ..?

 

 प्रेस मीडिया लाइव्ह : 

 एम एस पठाण : पिंपरी

एक मोठ्या शहरात तहसील कार्यालयात तहसीलदाराची कर्तव्य असलेली कामकाजाचा कारभार कोतवाल करत असल्याचे बोलले जात आहे,  सुशिक्षित शहरातील तहसील कार्यालयात गोडबंगाल होतानाची  नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. तहसिल कार्यालयात कोणत्या फाईली लवकर होणार मंजूर ,  ही सर्व कामे होणार असे कोतवाल मोठ्या धाडसाने बोलून व करून दाखवत आहे,

 तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुद्धा कोतवालचे धाक

   तहसिलीतील कर्मचाऱ्यांना काम करण्यात अडचणी निर्माण करत असून वरिष्ठ अधिकारी माझ्या मर्जीतले आहे असा दम देत आहे अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे कोतवाल पदावरील कर्मचाऱ्यांना त्याच्या गावातील तलाठी सजा कार्यालयावरच ठेवून त्यांच्याकडून गाव पातळीवरची कामे करून घ्यावी असा शासनाच्या वरिष्ठ अधिकारी मुख्य सचिव यांचे स्पष्ट आदेश असताना सुध्दा सदर कोतवाल तहसील कार्यालयात स्वतंत्र कॉम्प्युटर डेस घेऊन काम  भूषवत असतानाचे चित्र दिसत आहे 

यावरून शहरात तहसीलदार यांच्या तो कोतवाल खरच मर्जीतला आहे असे कार्यालयातील कर्मचारी व नागरिकांत दबक्या आवाजात चर्चा रंगत आहे. तसेच सदर कोतवाल यांची नियृक्ती तहसील कार्यालयात करत असताना इतर वरिष्ठांशी सल्ला-मसल्लत अथवा त्या बद्दल विचारना झाली होती का हा संशोधनाचाच  विषय आहे.?



Post a Comment

Previous Post Next Post