टीईटीनंतर राज्यातील हा सर्वात मोठा घोटाळा समजला जातोय. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : पुणे पोलिसांनी बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश . दहावी नापास मुलांना चक्क पास असल्याचे प्रमाणपत्र ही टोळी वाटप करत होती. टीईटीनंतर राज्यातील हा सर्वात मोठा घोटाळा समजला जातोय. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे.
दहावी नापास असलेल्यांना बनावट प्रमाणपत्र देत असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ही टोळी दहावी नापास मुलांना चक्क पास असल्याचे प्रमाणपत्र वाटप करत होती. यासाठी महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल सारखी बनावट वेबसाईट देखील तयार करण्यात आली होती.
या रॅकेटचा मुख्य आरोपी छत्रपती संभाजीनगरचा असून कृष्णा सोनाजी गिरी (रा. बिडकीन, छत्रपती संभाजी नगर) असं त्याचे नाव आहे त्याच्या सोबत अल्ताफ शेख रा. परांडा जी.धाराशिव) आणि सय्यद इमरान सय्यद इब्राहिम (रा. छत्रपती संभाजीनगर) यांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील मुख्य समजल्या जाणाऱ्या कृष्णा गिरी याने काही दिवसांपूर्वी त्याने महाराष्ट्र पब्लिक स्कूल नावाने एक संस्था सुरू केली. या संस्थेद्वारे नापास झालेल्या विद्यार्थ्यांना तो पास झाल्याचे प्रमाणपत्र देत होता. यासाठी त्याने एक कार्यालय देखील सुरू केलं होतं. मुलांच्या ऍडमिशन साठी तो सोशल मीडियावरून प्रचार देखील करायचा. मात्र आता याच कृष्णा गिरीला पुणे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहे