पुरंदर तालुक्यातील नारायणपूर येथे भाऊ वल्ली चित्रपटाचा मुहूर्त संपन्न,
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : पुरंदर तालुक्यातील नारायणपूर येथे भाऊ वल्ली चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला .ग्रामीण भागातील विवीध विषयावर भाष्य करणारा मानवसेवा मानिनी ट्रस्ट निर्मित चित्रपटाचे मुहूर्त पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणपूर मंदिराचे महाराज यांच्या हस्ते मराठी व हिंदी भाषेत निर्माण होणारा भाऊ वल्ली चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला . या प्रसंगी चित्रपटाचे कलाकार सैराट फेम सल्या आरबाज शेख, महेंद्र बोरकर, दिनेश काळे, अक्षय यांच्या सोबत स्थानिक सरपंच प्रदीप बोरकर, होते.
चित्रपटाचे दिग्दर्शन आशिष जैन हे करणार असून अल्ताफ पिरजादे निर्माता अहेत. याप्रसंगी संगिता पिंगळे, दिलीप अबनावे, नेहा घुगे, जयकुमार नायर, निशा पाटील, मनीषा जाधव, रियाज पिरजादे आदी मान्यवर उपस्थित होते.